Sarvajanik Satya Dharm Pustak by Mahatma Jyotirao Fule in Marathi.
Sarvajanik Satya Dharm Pustak by Mahatma Jyotirao Fule. Originally written in Marathi.
सार्वजनिक सत्य धर्मपुस्तक हे महात्मा जोतिराव फुले यांनी लिहिलेले मराठी पुस्तक आहे. फुल्यांनी आपल्या हयातीत लिहिलेले हे अखेरचे पुस्तक आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र यशवंत जोतिराव फुले यांनी इ.स. १८९१ साली हे पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक फुल्यांच्या धर्मविषयक मतांचे सार मानले जाते.
आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये फुल्यांना पक्षाघाताची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांनी हे पुस्तक आपल्या डाव्या हाताने लिहून पूर्ण केले. याची रचना संवादात्मक असून धर्म, पाप, पुण्य इत्यादी विषयांवर विविध व्यक्तींनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी यात उत्तरे दिली आहेत.